गलवानमध्ये शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांची पत्नी झाल्या उपजिल्हाधिकारी

searchnagpur July 23, 2020 No Comments

गलवानमध्ये शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांची पत्नी झाल्या उपजिल्हाधिकारी

हैद्राबाद | काही दिवसांपूर्वी गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली होती. यामध्ये भारताच्या 20 जवानांना हौतात्म्य आलं होतं. तर भारतानंही प्रत्युत्तर देत चीनच्या 40 सैनिकांना ठार केलं होतं. दरम्यान, या चकमकीत कर्नल संतोष बाबू हे शहीद झाले होते.

तेलंगणा सरकारनं संतोष बाबू यांच्या पत्नी संतोषी यांना सरकारी नोकरी देऊ केली आहे. तसंच त्यांच्याकडे उपजिल्हाधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती आहे.

कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नी संतोषी या आपल्या आठ वर्षांच्या मुलीसह आणि 3 वर्षाच्या मुलासह दिल्लीत राहत आहेत. , त्यांना तेलंगणा सरकारनं सरकारी नोकरी देत त्यांच्याकडे उपजिल्हाधिकारी पदाची जबाबदारी दिली आहे. काही दिवसांपूर्वी संतोष बाबू यांच्या सन्मानार्थ तेलंगण सरकारनं त्यांच्या कुटुंबीयांना पाच कोटी रूपये देण्याची घोषणाही केली होती.

गेल्या महिन्यात भारत आणि चीनदरम्यान गलवान खोऱ्यात चीन आणि भारताच्या जवानांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षादरम्यान 20 जवानांना हौतात्म्य आलं होतं. तर भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर देत चीनच्या 40 जवानांना ठार केलं होतं.

Tags :